वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दूरसंचार कंपनी भारती एअरटेलने क्लाउड कम्युनिकेशन मार्केटमध्ये पाय ठेवलेला आहे. यासंदर्भात कंपनीने मार्केटमध्ये आपले प्रोडक्ट सादर केले आहे. यासाठी कंपनीने त्याचे एअरटेल आयक्यू असे नामकरण केले आहे. हा एक क्लाउडवर आधारीत ओम्नी चॅनेल कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म आहे.
भारतामध्ये स्विगी, जस्टडायल, अर्बन कंपनी, हॅवेल्स, डॉ. लाल पॅथलॅब्स आणि रॅपिडो यासारख्या अनेक मोठय़ा कंपन्या ग्राहकांच्या पातळीवर एअरटेल आयक्यूचा वापर करत आल्या आहेत.
क्लाउडचे देशातील मार्केट
भारतात क्लाउड कम्युनिकेशनची बाजारपेठ 73 अब्ज रुपयांपेक्षा अधिक आहे. सोबत यामध्ये प्रत्येक वर्षाला 20 टक्क्यांची वाढ दिसून येत आहे. युनिफाइड प्लॅटफॉर्मच्या आधारे डेस्कटॉप आणि मोबाईलवर डिजिटल पद्धतीने व्यवहार करणे सोपे होणार असल्याची माहिती एअरटेलने दिली आहे.









