अपण जर नियमितपणे इन्स्टाग्राम पाहात असाल व त्यावरील फॅशन टेंडसवर आपले लक्ष असेल तर आपल्याला हा नवीन ट्रेंड नक्कीच दिसला असणार. फक्त #chochet हे शब्द शोधून पाहा, आज फॅशन जगतात क्रोशे या विणकामाच्या प्रकाराची लोकप्रियता कळेल. एकेकाळी घरातील स्त्रिया वेळ घालवण्यासाठी व आपली कला जोपासण्यासाठी क्रोशाचे विणकाम करीत. लेस, तोरण, जॅकेट, टेबलक्लॉथ असे हमखास विणले जाई. आज मात्र क्रोशानं कात टाकलीय. क्रोशाचे विणलेले ड्रेसिस आवडीनं परिधान केले जात आहेत. रंगीत क्रोशे जंपरला लेदर मोटो जॅकेटसोबत वापरतात. साध्या टी-शर्ट जीन्सवर क्रोशेच्या पॅचवर्कचा श्रग लुकच पालटतो. पांढऱया क्रोशाची जागा गडद रंगांनी घेतली आहे. याची वीण इतकी सुबक असते की रंगांमुळे त्याला आणखी उठाव येतो. साध्याशा आऊटफिटला कुठल्याकुठे उंचीवर नेऊन ठेवण्याची क्षमता या क्रोशात असते. संबंध ड्रेस किंवा स्कर्ट क्रोशातून विणताना कारागिरीचे कसब लागते, पण जे निर्माण होतं ते कलाकृतीपेक्षा कमी नसतं. शिवाय घट्ट विणीमुळे हे कपडे लवकर खराब होण्याची भीती नसते. कोणत्याही ऋतूत आवर्जून वापरता येणारा हा प्रकार आता आपल्याही वॉर्डरोबमध्ये हवाच.
Trending
- schedule
- इंग्लंड महिलांचा दुसरा विजय
- दीपक, कमलजीत, राज चंद्रा यांना सांघिक सुवर्ण,
- सावंतवाडी शहरातील रस्ते आणि स्वच्छता व्यवस्थेची दूरवस्था
- न्हावेली शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी ग्रामस्थांकडून शिक्षणमंत्र्यांना निवेदन
- शिवसंस्कारच्या माध्यमातून सावंतवाडीत इतिहास अभ्यासकांचा होणार सन्मान
- भाजप प्रवेश नाकारल्यामुळेच मंत्री केसरकर धनुष्यबाणावर लढतायत
- रत्नागिरी रेल्वे स्थानकाबाहेर कामगार सेनेचे जोरदार आंदोलन