एक गोष्ट खरी आहे की राग म्हणजे क्रोध… ही एक सामान्य भावना आहे. शारीरिक प्रतिक्रिया आहे. परंतु कधी कधी कुणाचा राग या मर्यादेपर्यंत वाढत जातो की तो स्वतःच्या आयुष्यावर आणि दुसऱयांच्या आनंदावर परिणाम करायला लागतो. खूप लोक असे असतात की ज्यांना राग तर येतो परंतु ते हे स्वीकारायला तयार नसतात की ते रागीट स्वभावाचे आहेत. अशावेळी त्यांचा विचारांवरील ताबा सुटतो. आणि ज्यांच्यावर त्यांचे नितांत प्रेम असते, त्यांनाच नुकसान पोचू शकते.
रागाला ओळखण्याचे संकेत
जीवन केवळ सुखाचे नाव नाही, यामध्ये सुखासोबत संकटेसुद्धा येत-जात राहतात. अशावेळी कठीण परिस्थितीचा बाऊ करण्यामध्ये शहाणपण नाही परंतु आपल्या रागापासून आपले नाते वाचविण्यात शहाणपण आहे. रागाचे काही स्पष्ट संकेत असतात ज्यामुळे हे माहिती होते की आम्ही रागामध्ये आहे.
धैर्याची कमतरता, समोरच्यास कमी लेखणे, चिड़चिड़ करणे, प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱयाला दोषी ठरविणे, राग आल्यावर काम बंद करणे किंवा मागे हटणे, लोकांचे तुमच्यापासून दूर जाणे, पत्नी मुले आणि नातेवाइकांचे तुमच्याशी भीतीने बोलणे.
याला आपण एक प्रकारे सामान्य लक्षण मानू शकतो. परंतु या शिवाय रागाचे खूप सारे प्रकार असू शकतात. आमच्या आजूबाजूचे लोक, मित्र, नातेवाईक किंवा स्वतःमध्येही या प्रकारचे लक्षण असू शकते. परंतु याबाबत कोणाही प्रकारची शरम नको यायला. या समस्येचे समाधान शोधायला पाहिजे.
यासाठी जर असे वाटते कि आपल्याला राग येत आहे तर यामध्ये आपल्याला स्वतःच आधी पाऊल उचलावं लागेल. आता प्रश्न हा आहे की रागावर कसे नियंत्रण करावे.
रागावर नियंत्रण करण्यासाठी काही सोपे उपाय
बहुतेक लोक आपल्या रागाला मित्र, नातेवाईक याच्यापासून लपवून ठेवतात. परंतु यांच्या रागाची माहिती या लोकांना आपल्या प्रियजनांशी केलेल्या व्यवहारावरून माहिती होते. यांच्या रागाचे दर्शन आपण तेव्हा करू शकतो जेव्हा असे लोक त्यांच्यावर राग दाखवतात ज्यांना ते प्रिय आहेत. जर तुम्ही सुद्धा एवढे रागीट माणूस आहात तर काही सोपे उपाय वापरून रागाला झटकन गायब करून आपल्या नात्यांना सुन्दर बनवू शकता.
जेव्हा आपल्याला वाटते की आपण रागात आहोत तेव्हा सर्वात आधी काहीही प्रतिक्रिया देण्यापेक्षा शांत व्हा आणि दीर्घ श्वास घ्या. यामुळे आपल्याला रागावर नियंत्रण येण्यासाठी मदत होईल. आणि त्यानंतर 1 ते 10 पर्यंत अंक मोजा. यामुळे आपल्याला विचार करायला आणि समजायला थोड़ा वेळ मिळेल.
जर आपण रागामध्ये अनियंत्रित होत असाल अशा वेळी आपण कोणत्याही विवादात पडू नये कारण आपण आपले नियंत्रण सुटण्याची शक्मयता असते. त्यामुळे त्या जागेवरून दूर होऊन थोडा वेळ मन शांत ठेवावे. थंड पाणी प्या आणि थोडे फार चालू लागा. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही आणि दुसरी व्यक्ती शांत होईल तेव्हा आपली चर्चा पुन्हा सुरु करू शकता.
रागाचे कारण ओळखा
सर्वप्रथम कोणत्या परिस्थितीमुळे क्रोध वाढत आहे, ती कारणे व परिस्थिती समजून त्यावर तोडगा काढण्यासाठी विचार करा. व्यायामामुळेही रागाचा पारा कमी करता येऊ शकतो. सकाळच्या ताज्या हवेमध्ये निसर्गासोबत काही वेळ राहणे, दीर्घ श्वास घेणे योग करणे यामुळे मनाला शांती मिळेल. रागावर नियंत्रण मिळविण्यात खूप फायदेशीर राहील.
रागामुळे झोपमोड होते व परिणामी डोकेदुखी, तणाव आणि चिडचिड होऊन विनाकारण दुसऱयावर ओरडतो. यासाठी तुम्ही तुमच्या व्यस्त दिनचर्येमधून 7 तासांची झोप जरुर घ्या. रागीट स्वभाव माणसाच्या इच्छेवर पाणी सोडतो. आपल्या रागाला दाबू नका. आपल्या रागाच्या कारणास ओळखा आणि रागाला दूर करण्याचा प्रयत्न करा. एक वेळ प्रयत्न तर करून पहा मग आपल्याला स्वतःलाच जाणवेल की राग नष्ट झाल्यामुळे नाती किती सुंदर बहरतात ती!!!