वृत्तसंस्था/ पालेर्मो
इटलीत कोरोना महामारी संकटानंतर तब्बल चार महिन्यांनी डब्ल्यूटीए टूरवरील पालेर्मो महिलांची आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा सुरू झाली. या स्पर्धेत पहिल्या दिवशी अव्वल सीडेड खेळाडूंना संमिश्र यश मिळाले.
क्रोएशियाच्या पेत्रा मार्टिकने महिला एकेरीत विजयी सलामी देताना बेल्जियमच्या युटेव्हॅन्सेकचा 6-0, 6-3 अशा सरळ सेटस्मध्ये 65 मिनिटांच्या कालावधीत पराभव करत विजयी सलामी दिली. मात्र द्वितीय मानांकित व्होंड्रोसोव्हाला पहिल्याच फेरीत स्लोव्हेनियाच्या ज्युवेनकडून हार पत्करावी लागली. ज्युवेनने व्होंड्रोसोव्हाचा 1-6, 7-5, 6-4 असा पराभव करत दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला. हा सामना अडीच तास चालला होता.









