वृत्तसंस्था/ झाग्रेब
2018 साली झालेल्या फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील उपांत्य सामन्यात इंग्लंड विरुद्ध विजयी गोल नोंदविणारा क्रोएशियाचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू मारियो मॅनझुकीकने आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रातून निवृत्तीची घोषणा केली.
35 वर्षीय मॅनझुकीकने तीन वर्षापूर्वी आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. मॅनझुकीकने आपल्या वैयक्तिक कारकीर्दीत 89 सामन्यात कोएशियाचे प्रतिनिधीत्व करताना 33 गोल नोंदविले आहेत. क्लबस्तरीय फुटबॉल स्पर्धेत त्याने बायर्न म्युनिच, ऍटलेटिको माद्रिद आणि युवेंटस या क्लबचे प्रतिनिधीत्व केले होते.









