नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यानंतर आता क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रिजिजू यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली. सध्या मी शारीरिकदृष्टय़ा सक्षम असलो तरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी क्वारंटाईन व्हावे आणि स्वतःची कोरोना चाचणी करावी, असा सल्लाही त्यांनी दिला. रिजिजू यांनी नुकताच विविध कार्यक्रमांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिह्याचा दौरा केला होता. या दौऱयात ते उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांसह काही उच्चपदस्थ अधिकाऱयांच्या संपर्कात आले होते.









