अल्बा बपिस्तानसोबत रिलेशनशिपमध्ये
कॅप्टन अमेरिका फेम क्रिस इवान्स पुन्हा एकदा प्रेमात पडला आहे. क्रिसनेच यासंबंधी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. पोर्तुगालची अभिनेत्री अल्बा बपिस्ताला तो डेट करत असल्याचे समजते. इन्स्टाग्रामवर इवान्सने एक छायाचित्र शेअर केले असून याच्या एका हिस्स्यात तो तर दुसऱया हिस्स्यात अल्बा दिसून येत आहे.

अल्बा ही पोर्तुगीज अभिनेत्री आहे. 2014 मध्ये पोर्तुगीज सीरिज जार्दिन्स प्रोबिडोस या सीरिजद्वारे तिने स्वतःच्या कारकीर्दीला सुरुवात केली होती. अल्बा केवळ 25 वर्षांची असून तिने अनेक चित्रपट अन् सीरिजमध्ये काम केले आहे. मागील वर्षी ती नेटफ्लिक्सची सीरिज वॉरियर ननमध्येही दिसून आली होती आणि हे तिचे इंग्रजीतील पदार्पण देखील होते.
13 जून 1981 रोजी जन्मलेल्या क्रिस इवान्सचे खरे नाव क्रिस्टोफोर रोबर्ट आहे. 41 वर्षीय क्रिस इवान्सने ऍव्हेंजर्स, कॅप्टन अमेरिका, फँटेस्टिक फोर यासारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. क्रिस इवान्सचे यापूर्वी अनेक अभिनेत्री तसेच मॉडेलसोबत नाव जोडले गेले आहे. क्रिसचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे.









