सुशांत कुरंगी/ बेळगाव
कोरोनाचा फैलाव होवू नये यासाठी सरकारने जलतरण तलाव मागील 7 महिन्यांपासून बंद केली आहेत. त्यामुळे जलतरण प्रशिक्षक, देखभाल करणाऱया कर्मचाऱयांचा रोजगार ठप्प झाला आहे. आर्थिक अडचणीत सापडलेले राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू आता दुसऱया व्यवसायाकडे वळले आहेत. क्रिडा प्रकारांशिवाय दुसरा आर्थिक स्त्राsत नसल्यामुळे बेळगावमधील क्रिडापटूंवर रस्त्याशेजारी दुकान लावून ड्रायप्रुट विकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे देशाचे – राज्याचे तसेच बेळगावचे नाव अनेक क्रिडा उज्वल करणाऱया क्रिडापटूंना अशा प्रकारे छोटे – मोठे उद्योग करून आयुष्याचा गाडा हाकावा लागत आहे.
कारोना व त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले तर अनेकांना गावी जावून शेती करावी लागली. क्रिडास्पर्धांना बेक लागल्यामुळे खेळाडू मागील 7 महिन्यांपासून घरी आहेत. पुढील अजून काही दिवस क्रिडास्पर्धा होण्याची चिन्हे नसल्यामुळे त्यांना आता इतर व्यवसायांकडे वळावे लागत आहे. गोवावेस येथे राहणारे कल्लाप्पा पाटील व त्यांचे कुटुंबही क्रिडा प्रकारांवर आपली उपजिविका करतात. ते स्वत: जलतरण प्रशिक्षक असून त्यांची पत्नी राजश्री व मुलगा भरतही मुलांना जलतरणाचे धडे देतात. परंतु जलतरण तलाव बंद असल्याने या कुटुंबाने गोवावेस येथे काजू, बदाम, मनूका, फराळाच्या साहित्याची विक्री करण्यास सुरूवात केली आहे.
कल्लाप्पा पाटील हे मुळचे अलतगा गावचे. जलतरणाची आवड असल्यामुळे गोवावेस येथील जलतरण तलावाच्या देखभालीची जबाबदारी त्यांच्याकडे आली. या व्यवसायासोबतच त्यांनी चार वेळा फ्री स्टाईल स्विमींग प्रकारात राष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखविली आहे. तर 2008 साली त्यांनी इंग्लिश खाडी पोहून येवून बेळगावचे नाव उज्वल केले होते. त्यांचा मुलगा भरत हा देखील स्केटींग या क्रीडा प्रकारात चारवेळा राष्ट्रीय स्तरावर चमकला आहे. तर मागील वषीच त्याने विश्वविक्रमही केला आहे.
मागील वषीच केला होता विश्वविक्रम
भरत हा अनेक क्रिडा प्रकारांकडे पारंगत आहे. स्केटींग सोबतच सायकलिंग, स्विमींग, रनिंग, जंप ड्रायव्हिंग अशा विविध क्रिडा प्रकारांमध्ये तो सरस आहे. त्याने मागील वषी 20 क्रिडाप्रकार 9 तासांमध्ये पूर्ण करण्याचा निश्चय केला होता. परंतु प्रत्यक्षात 6 तास 8 मिनिटांमध्ये त्याने ते पूर्ण करत विक्रम प्रस्तापित केला होता. यामुळे बेळगावचेही नाव विश्वविक्रमापर्यंत पोहचले होते. या विक्रमामुळे त्याचे सर्वत्र कौतुकही करण्यात आले होते.
कल्लाप्पा पाटील (क्रिडापटू व प्रशिक्षक)
आमचे सर्व कुटुंब हे क्रिडाप्रकारांवर अवलंबून आहे. परंतु लॉडलाऊनपासून सर्व क्रिडा प्रकारांना ब्रेक लागल्याने आर्थिक चणचण जाणवू लागली. प्रवाहासोबत आम्ही हा विचार करून आम्ही हार न मानता रस्त्याशेजारी दुकान टाकण्याचा निर्णय घेतला. काजू, मनुका, बदाम, खारीक फराळाचे साहित्य विक्री करण्यास सुरूवात केली. पुढील काही दिवसांमध्ये हे चित्र नक्की बदलेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
भरत पाटील (राष्ट्रीय क्रिडापटू)
राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळूनही आज कोरोनामुळे माझ्यावर मास्क विक्री करण्याची वेळ आली आहे. क्रिडा स्पर्धां व प्रशिक्षणाशिवाय दुसरा आर्थिक स्त्राsत नसल्यामुळे गोवावेस येथे रस्त्याशेजारी दुकान सुरू करावे लागले आहे. त्यामुळे सरकारने खेळाडूंकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा गुणवत्ता असूनही क्रिडापटूंना इतर कामे करावी लागत असल्याचे त्याने सांगितले.









