कोल्हापूर प्रतिनिधी
क्रिडाई कोल्हापूरतर्फे 8 ते 11 एप्रिलअखेर शिवाजी पार्क येथील जिमखाना मैदानावर, पश्चिम महाराष्ट्रातील भव्य वास्तू व बांधकाम विषयक आयोजित ’दालन 2022` च्या माहिती पुस्तकाचे अनावरण शुक्रवारी रेसिडेन्सी क्लबमध्ये करण्यात आले. याचे प्लॅटिनम प्रायोजक महालक्ष्मी स्टील इंडस्ट्रिज लि. चे जितेन्द्र गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपिठावर क्रिडाई कोल्हापूर अध्यक्ष विद्यांनंद बेडेकर, गौतम परमार, प्रदीप भारमल, प्रकाश देवलापूरकर, चेतन वसा, सोमराज देशमुख, अजय डोईजड यांची प्रमुख उपस्थिती होती.
क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांनी आपल्या प्रास्ताविकात संघटनेच्या 33 वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा घेत, त्यांनी क्रिडाईने बांधकाम व्यावसायिकांचे हित जोपासण्याबरोबर, शहराच्या विकासात केलेल्या भरीव कार्यावर प्रकाश टाकला. दालन 2022 बद्दल माहीती देताना त्यांनी, 1992 ला बांधकाम विषयक प्रदर्शनला प्रारंभ झाला. यंदाचे दालन 2022 हे 11 वे दालन आहे. या दालनचे उद्घाटन 8 एप्रिल रोजी पालकमंत्री सतेज पाटील, यांच्या हस्ते होणार असल्याचे सांगितले.
दालन 2022 विषयी दालनचे चेअरमन प्रकाश देवलापूरकर यांनी अधिक माहीती दिली. कोल्हापूर व परिसरातील ग्राहकांना एकाच छताखाली नवनविन बांधकाम प्रकल्प व तंत्रज्ञान बांधकामविषयक साहीत्य आधुनिक उपकरणे, अर्थ सहाय्य करणा-या संस्था व बँकाच्या योजना यांची माहिती मिळणार आहे. घराचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यास या प्रदर्शनाचा मोठा हातभार लागणार आहे. तसेच दालन 2022 हे परंपरा विश्वासाची सुरवात स्वप्नपुर्तीची या संकल्पनेवर आधारित असून याचे लक्ष हे यंदा संधी सर्वासाठी असे आहे.
या दालनमध्ये 150 हून अधिक स्टॉल्स असून सर्व स्टॉलचे बुकिंग झाले आहे. क्रिडाई कोल्हापूरचे 60 नामवंत बिल्डर्स आपले शंभराहून अधिक प्रकल्प दालन मध्ये प्रदर्शित करणार आहेत.
दालन 2022 चे समन्वयक सोमराज देशमुख यांनी प्ा्रथमच वातानुकूलीत मंडपामध्ये येत असल्याने हे वेगळे दालन असणार आहे.
या कार्यक्रमास क्रिडाई कोल्हापूरचे उपाध्यक्ष चेतन वसा, सचिव प्रदिप भारमल, खजानिस गौतम परमार, दालन समन्वयक सोमराज देशमुख, दालन उपाध्यक्ष अजय डोईजड, दालन खजानिस संदिप मिरजकर, दालन विविध कमिटय़ांचे चेअरमन व सदस्य तसेच क्रिडाई कोल्हापूर पदाधिकारी व सभासद प्रायोजक, स्टॉलारक मोठय़ा संख्येने उपस्थित होते आभार प्रदर्शन क्ा्रिढडाईचे सचिव प्रदिप भारमल यांनी केले.









