वेलिंग्टन : 2020 सालातील भारतात खेळविली जाणारी आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धा कोरोना महामारी समस्येमुळे लांबणीवर टाकण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला. सदर स्पर्धा गेल्या मार्च महिन्यात घेण्यात येणार होती. आता या स्पर्धेचे यजमानपद न्यूझीलंड भूषविणार असल्याचे वृत्त पसरल्यानंतर त्यावर क्रिकेट न्यूझीलंडने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून तो केवळ अनुमान असल्याचे त्यांनी म्हटले. आयपीएल भरवण्यासाठी क्रिकेट न्यूझीलंड इच्छुक नसल्याचे प्रवक्ते रिचर्ड बुक यांनी सांगितले. कोरोना महामारीमुळे आयपीएल स्पर्धा आयोजकांनी तसेच बीसीसीआयने सदर स्पर्धा बेमुदत कालावधीसाठी लांबणीवर टाकली आहे.
क्रिकेट क्षेत्रामध्ये केवळ उत्सुकता निर्माण करावी या हेतूने कदाचित आयपीएल स्पर्धेचे यजमानपद न्यूझीलंड भूषविणार असल्याचे वृत्त पसरविले जात असावे, असा तर्क व्यक्त केला जात आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धा न्यूझीलंड, संयुक्त अरब अमिरात आणि श्रीलंका देशामध्ये भरविण्याचे प्रयत्न चालू असल्याचे वृत्त बीसीसीआयच्या एका वरि÷ अधिकाऱयाने दिले आहे. ऑस्ट्रेलियातील आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा कोरोना समस्येमुळे लांबणीवर पडण्याची शक्मयता अधिक असल्याने याच कालावधीत आयपीएल क्रिकेट स्पर्धा भरवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.









