दिग्दर्शक सुजॉय घोष यांचा चित्रपट
करिना कपूर पुन्हा एकदा चित्रपटाच्या सेटवर परतण्यास तयार आहे. अभिनेत्री दिग्दर्शक सुजॉय घोष यांच्या क्राइम मिस्ट्रीमध्ये दिसून येणार आहे. लेखक केगो हिगाशिनो यांच्या द डिवोशन ऑफ सस्पेक्ट एक्सच्या अधिकृत हिंदी रिमेकमध्ये करिना काम करणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत जयदीप अहलावत आणि विजय वर्मा देखील मुख्य भूमिकेत असतील. चित्रपटाचे चित्रिकरण मार्चमध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. स्वतःच्या पूर्वाश्रमीच्या पतीची चुकून हत्या करणाऱया एकल आईची ही कहाणी असणार आहे.

करिनाने स्वतःच्या व्यक्तिरेखेसाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. करिना लवकरच ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटात दिसून येणार असून तो 14 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. करिना आणि आमिर खान हे तिसऱयांदा चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. यापूर्वी त्यांनी तलाश आणि 3 इडियटस या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. याचबरोबर करिनाकडे एकता कपूर आणि हंसल मेहता यांचा एक चित्रपट आहे. परंतु या चित्रपटाच्या नावाची अद्याप घोषणा झालेली नाही. करण जौहरच्या तख्त चित्रपटातही ती दिसून येणार आहे.









