वृत्तसंस्था/ लास व्हेगास
शनिवारी येथे झालेल्या मुष्टीयुद्ध लढतीत क्यूबाचा मुष्टीयोद्धा यॉर्डेनिस युगासने विश्व मुष्टीयुद्ध संघटनेच्या (डब्ल्यूबीए) वेल्टरवेट गटाचे जेतेपद स्वतःकडे राखताना मॅनी पॅक्वीओचा पराभव केला.
डब्ल्यूबीएच्या वेल्टरवेट गटातील जेतेपदासाठी झालेल्या या लढतीत 35 वर्षीय क्यूबाच्या युगासने 42 वर्षीय पॅक्वीओचा पराभव केला. या लढतीसाठी आयोजलेल्या एका पंचाने युगासला 115-113 गुणांनी तर अन्य दोन पंचांनी 116-112 अशा गुणांनी विजयी घोषित केले. 1995 पासून पॅक्वीओने आपल्या 26 वर्षांच्या मुष्टीयुद्ध कारकीर्दीत 72 लढतीत सहभाग दर्शविला. शनिवारच्या लढतीत युगासने 10 फेरीत आपल्या जबरदस्त खेळाच्या जोरावर पॅक्वीओला पराभूत केले.









