मुली विवाह करून नवऱयाला आणतात घरी
गावात तब्बल 400 कुटुंबांमध्ये घरजावई
महिला सशक्तीकरणाची अनेक उदाहरणे तुम्ही वाचली किंवा पाहिली असतील. परंतु कौशांबीच्या करारीनगरमधील पुरवा गाव अनेकार्थाने सामाजिक चौकटी मोडीत काढणारे आहे. हे जावयांचे गाव आहे. विवाहानंतर पती गावात येऊन स्थायिक होण्याची प्रथा चालल्याने आता 400 कुटुंबांची हीच कहाणी आहे. विवाहानंतर मुलांचा विवाह करून देत मुलीच पूर्ण घर चालवत आहेत.
या गावात राहणारे बहुतांश पुरुष हे मूळचे अन्य ठिकाणचे आहेत. विवाहानंतर या पुरुषांनी येथे जम बसविला आहे. सासरच्या बंधनांपासून मुक्त महिला येथे पतीसोबत समानतेसह सर्वप्रकारे मदत करते. या गावात राहणाऱया पुरुषांसोबत महिला देखील चरितार्थ चालविण्यास मदत करतात.

या गावात विडी निर्माण करण्याचे काम महिलांकडून केले जाते. दशकांपासून जावयांनी येथे स्वतःचे कुटुंब वसविले आहे. या गावात 70 वर्षांपासून 25 वर्षांच्या वयोगटातील जावई कुटुंबासमवेत आनंदाने राहत आहेत.
महिलांना समान हक्क
मुलींना मुलांसमान शिक्षण आणि अन्य सुविधा दिल्या जातात. या गावात मुली मुलांप्रमाणेच सर्व कामे करू शकतात. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे बंधन नाही. येथे काही कुटुंबे तर अशी आहेत, ज्यात सासरा देखील घरजावई होऊनच गावात आला होता.









