नगरपरिषदेसमोरील टाकीवरून उडी टाकण्याचा प्रयत्न
प्रतिनिधी/ सातारा
सातारा नगरपरिषदेच्या समोरील पाण्याचा टाकी वरून रविवारी सायंकाळी 5ः45 वाजता शुभम वाल्मिकी चव्हाण या युवकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु नागरिक व सातारा पोलिसांच्या सतर्कतेमुळे युवकांचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न फसला.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, रविवारी सायंकाळी 5ः45 वाजण्याच्या सुमारास सातारा नगर परिषद समोरील उंच पाण्याचा टाकीवर एक युवक चढला असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सातारा पोलिसांना कळविण्यात आले. यांची माहिती सातारा वाहतूक शाखेतील पोलीस नाईक सोमनाथ शिंदे आणि रविवार पोलीस चौकीचे पोलीस हवालदार अरुण दगडे यांना मिळताच ते घटना स्थळी पोहचले. यांच्यासह सातारा शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कोरले यांनी घटना स्थळी धाव घेतली.
यावेळी युवकाची नजर चुकवून पोलीस नाईक शिंदे आणि हवालदार दगडे हे पाण्याचा टाकीवर वर चढले. त्याच वेळी परशुराम कोरले आणि पोलीस हवालदार दीपक ताटे हे ही टाकीवर चढले. या युवकाची नजर चुकवून सोमनाथ शिंदे यांनी त्याच्यावर झडप टाकून ताब्यात घेतले. या ठिकाणी झटपती होत असलेली पाहून अनेकांनी गर्दी केली होती. तर काहींनी युवक आत्महत्या करणार असा अंदाज बांधून ठेवला होता. परंतु पोलीसांच्या सावधगिरीने युवकांचा प्रयत्न फसला. या युवकाला शहर पोलीसांनी ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात आणले. या आत्महतेचे कारण विचारले असता कौटुंबिक वादातून केल्याचे या वेळी युवक शुभम वाल्मिकी चव्हाण याने सांगितले
सातारा शहर पोलिसांनी शुभम चव्हाण यांचे समुपदेशन करून त्यास धीर दिला. आणि नातेवाईकांना बोलावून शुभमला त्यांचा ताब्यात दिले. वाहतूक शाखेचे पो नाईक सोमनाथ शिंदे, शहर पोलीस हवालदार अरुण दगडे, पोलीस कॉन्स्टेबल दीपक ताटे, सहाययक पोलीस निरीक्षक परशुराम कोरके यांनी शितीफीने शुभमचा आत्महत्या करण्यापासून प्ररावृत्त केल्याबद्दल जिल्हा पोलिस प्रमुख अजयकुमार बन्सल, शहर पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर वाहतूक पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शेलार यांनी अभिनंदन केले








