नव्या अध्ययनाचा निष्कर्ष- दोन्ही डोसनंतर दोघांचाही प्रभाव चांगला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
स्वदेशी कोरोना लस कोव्हॅक्सिनच्या तुलनेत कोविशिल्ड पहिल्या डोसनंतर अधिक अँटीबॉडी तयार करण्यास सक्षम असल्याचा दावा एका अध्ययनात करण्यात आला आहे. कोरोना व्हायरस व्हॅक्सिन-इंडय़ूस्ड अँटीबॉडी टाइट्रेकडून (सीओव्हीएटी) करण्यात आलेल्या प्रारंभिक अध्ययनात यासंबंधी दावा करण्यात आला आहे. कोविशिल्ड लस घेणाऱया लोकांमध्ये सीरोपॉझिटिव्हीटी रेटपासून अँटी-स्पाइक अँटीबॉडीचे प्रमाण कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेणाऱया लोकांच्या तुलनेत खूपच अधिक होते असे अध्ययनानंतर म्हटले गेले आहे.
दोन्ही डोसनंतर कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन दोघांचाही प्रतिसाद चांगला आहे. पण सीरोपॉझिटिव्ही रेट आणि अँटी स्पाइक अँटीबॉडी कोविशिल्डमध्ये अधिक आहे. पहिल्या डोसनंतर ओव्हरऑल सीरोपॉझिटिव्ही रेट 79.3 टक्के राहिला. सर्वेक्षणात सामील 456 आरोग्य कर्मचाऱयांना कोविशिल्ड आणि 96 जणांना कोव्हॅक्सिनचा पहिला डोस देण्यात आला होता असे अध्ययनात म्हटले गेले आहे.
कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन दोन्हींपैकी कुठलीही लस देण्यात आलेल्या आरोग्य कर्मचाऱयांना अध्ययनात सामील करण्यात आले. तसेच यातील काही जणांना कोरोनाची लागण होऊन गेली होती. तर यापूर्वी विषाणूच्या संपर्कात न आलेले लोक देखील यात सामील होते.
इम्यून रिस्पॉन्स दोघांचाही प्रभावी
दोन्ही लसींचे दोन्ही डोस घेतलेल्या आरोग्य कर्मचाऱयांमध्ये इम्यून रिस्पॉन्स चांगला होता असे अध्ययनात निष्कर्षात म्हटले गेले आहे. सीओव्हीएटीकडून सुरू असलेल्या अध्ययनात दोन्ही लसींचा दुसरा डोस घेतल्यावर इम्युन रिस्पॉन्सबद्दल अधिक चांगल्याप्रकारे प्रकाश टाकला जाणार आहे.
आयसीएमआरची भूमिका
कोविशिल्डच्या पहिल्या डोसनंतर शरीरात अँटीबॉडीचे प्रमाण वेगाने वाढते. तर कोव्हॅक्सिनचे दोन्ही डोस घेतल्यावर शरीरात अँटीबॉडीजचे प्रमाण वाढत असल्याचे आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी मे महिन्यात सांगितले होते.









