नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
भारतात कोरोना संसर्गाविरोधात सुरु असलेल्या लसीकरण अभियानात दोन लसींचा वापर होत आहे. नागरिकांना सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशील्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन या लसींचे प्रत्येकी दोन डोस दिले जात आहेत. देशातील अनेक राज्यांमध्ये लसीचा तुटवडा आहे. तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरु केल्यानंतरही अनेक राज्यांमध्ये 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण सुरु होऊ शकलेलं नाही. याच दरम्यान एका सरकारी पॅनलने कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याची शिफारस केली आहे.
सरकारच्या नॅशनल टेक्निकल अॅडव्हायजरी गृप ऑन इम्युनायझेशन (NTAGI) या समितीने कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवून 12 ते 16 आठवडे करण्याची शिफारस केली आहे. तर कोवॅक्सिनच्या डोसमधील अंतरात कोणताही बदल केलेला नाही. यासोबतच गर्भवतींच्या लसीकरणाबाबतही या समितीने महत्त्वपूर्ण शिफारस केली आहे.
त्याचबरोबर ज्यांना कोरोनाची लागण झालेली आहे आणि लस घेण्याची वाट पाहत आहेत, त्यांना कोरोनातून बरे झाल्यानंतर सहा महिन्यांनी लस दिली जावी असा सल्लाही सरकारच्या या समितीने दिला आहे. यासोबतच गर्भवती महिलांना कोणतीही लस निवडण्याची मुभा असेल. तर स्तनपान देणाऱ्या महिला प्रसुतीनंतर केव्हाही लस घेऊ शकतात, असंही या समितीकडून सांगण्यात आलेलं आहे.
या समितीने सुचवण्यात आलेल्या सुधारणा आता राष्ट्रीय तज्ज्ञांच्या गटाकडे पाठवण्यात येणार आहेत. NTAGI ने दिलेल्या सल्ल्याचा विचार आता राष्ट्रीय तज्ज्ञांचा गट करेल आणि मग निर्णय घेतला जाणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









