प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात मंगळवारी कोविशिल्ड लस संपल्याने बुधवारी केंद्रांवर कोविशिल्ड लस मिळणार नाही. पण कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस मिळणार असल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.
जिल्हय़ात आठवडय़ाला 2 लाख 80 हजार लसीची मागणी आहे. प्रत्यक्षात त्यापेक्षा कमी लस पुरवठा होत आहे. गेली तीन दिवस लसीकरण केंद्रांवर गर्दी वाढत आहे. मर्यादित डोस प्रत्येक केंद्राला दिले जात असल्याने दुपारनंतर केंद्रांवर लस संपल्याचे फलक लागत आहेत. मंगळवारी विविध केंद्रांवर लस देण्यात आली. पण दुपारनंतर लाभार्थ्यांना लस संपल्याचे सांगण्यात आले.
सीपीआरमधील लसीकरण केंद्रांवर दुपारनंतर लाभार्थ्यांची गर्दी झाली, पण त्यांनाही टोकण नसल्याने, लस संपल्याने त्यांना परत पाठवले. तसेच लस संपल्याचा फलकही लावला. दरम्यान यासंदर्भात आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता. जिल्हय़ातील कोविशिल्ड लसीचा साठा संपला आहे. त्यामुळे बुधवारी कोविशिल्डचे लसीकरण होणार नाही. पण जिल्हय़ात कोव्हॅक्सिन लसीकरणाचा दुसरा डोस मात्र दिला जाणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









