ऑनलाईन टीम / केपटाऊन :
ऑक्सफर्ड-ॲस्ट्राझेनेकाने विकसित केलेल्या आणि भारतात ‘सीरम’ इन्स्टिट्यूटने निर्मिती केलेल्या ‘कोविशिल्ड’ लसीला दक्षिण आफ्रिकेत मंजुरी मिळाली आहे. दक्षिण आफ्रिकेचे आरोग्यमंत्री ज्वेलि मखाईज यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.
कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे दक्षिण आफ्रिकेची चिंता वाढली आहे. त्यामुळे या देशाने पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारी अखेरपर्यंत दक्षिण आफ्रिका ‘कोविशिल्ड’ चे 10 लाख डोस आयात करणार असल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान, भारताने नेपाळ, बांग्लादेश, भूतान आणि मालदीव या देशांना ‘कोविशिल्ड’ च्या काही लसी मोफत दिल्या होत्या. मात्र, आता व्यावसायिक दृष्टिकोनातून ब्राझील आणि माेराेक्काे देशांना लसीची निर्यात करण्यात आली आहे. सौदी अरेबियालाही या लसीची निर्यात होणार आहे.









