ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात कोरोना लसीकरण मोहिमेत प्रामुख्याने ‘कोविशिल्ड’ लसीचा वापर केला जात आहे. ही लस घेतल्यानंतर 11 जणांना ‘गिलन बार सिंड्रोम’ हा मेंदूशी संबंधित आजार झाल्याचे भारत आणि ब्रिटनमधील तज्ञांनी केलेल्या दोन स्वतंत्र संशोधनातून समोर आले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
‘कोविशिल्ड’ ही लस ॲस्ट्राझेनेका आणि ऑक्सफोर्डने निर्माण केली आहे. भारतात सीरम इन्स्टिटय़ूट कोविशिल्ड नावाने या लसीचे उत्पादन घेत आहे. मागील 10 ते 12 दिवसात कोविशिल्डची लस घेतलेल्या 11 जणांना ‘गिलन बार सिंड्रोम’ हा आजार झाला आहे. त्यामध्ये केरळमधील तर नॉटिंगहॅममधील 4 रुग्ण आहेत. गिलन बार सिंड्रोम आजार म्हणजे रोगप्रतिकारकशक्ती मेंदूच्या आणि पाठीच्या कण्याच्या बाहेर असलेल्या परिघीय मज्जासंस्थेवर आघात करते.









