वार्ताहर / यमगे
कोविड साथ व पूरस्थितीचा सामना करण्यासाठी कागल तालुक्यातील प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.कोविडचे मुंबई-पुण्यातील हे संकट तालुक्यात ग्रामीण भागात आले प्रशासन कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. नागरीकांनी डगमगून न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
मुरगूड ता. कागल येथे उद्भवलेली पुरपरिस्थिती व त्यांची वाढती रुग्ण संख्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत ते मार्गदर्शन करत होते. खासदार संजय मंडलिक,प्रांताधिकारी रामहरी भोसले,तहसिलदार शिल्पा ठोकडे,गटविकास अधिकारी शबाना मोकाशी,कागलचे मुख्याधिकारी मुरगूडचे संजय गायकवाड,आरोग्य अधिकारी पल्लवी तारळकर आदी उपस्थित होते.
मुरगूडसाठी अद्ययावत यंत्रणा सज्ज
मुरगूड येथे ग्रामीण रुग्णालय,कर्णिक हॉस्पिटल, जिजाऊ हॉस्पिटल, आदमापूर येथे बाळूमामा देवालय, कोविड सेंटरची उभारणी केली असून अद्यावत बेड, व्हेंटिलेटर, औषध आणि तज्ञ डॉक्टर कर्मचाऱ्यांचा स्टाफ सज्ज आहे. मुरगूडला 50 लाख रुपयांचा निधी, शहरात आणखी व्हेंटिलेटर,रुग्णवाहिका किंवा शववाहिका देण्याची घोषणा त्यांनी केली.गेल्या चार पाच महिन्यापासून आरोग्य विभागासह प्रशासनातील सर्व घटक चोवीस तास कार्यरत आहेत.त्यांचे हे काम कौतुकास्पद आहे असे ते म्हणाले.
पूरस्थिती निर्माण झाली तर आपत्कालीन सेवेसाठी एक लाईफ बोट आणि 10 जॅकेट्स प्रशिक्षित जवान तैनात केल्याचे त्यांनी सांगितले.
खासदार संजय मंडलिक म्हणाले ,”अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री,तालुका, कागल,मुरगुड,गडहिंग्लज शहरे असे मोठे कार्यक्षेत्र असतानाही एक दक्ष लोकप्रतिनिधी प्रमाणे मंत्री मुश्रीफ येणे सर्वत्र सूत्रबद्ध नियोजन केले आहे .परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर जागे होण्यापेक्षा अगोदरच प्रशासन दक्ष केले त्याबद्दल त्यांनी मुश्रीफ यांचे अभिनंदन केले.
पण प्रशासन दक्ष असले तरी नागरिकांची निष्काळजी आणि फाजीलपणा जीवावर बेतू शकतो असा इशाराही त्यांनी दिला. बैठकीत गारगोटी आणि बाळूमामा मंदिर येथील वैद्यकीय सेवेचा कार्यभार वैद्यकीय अधिकारी डॉक्टर डवरी यांच्याकडे द्यावा व मुरगुडसाठी डॉ.अमोल पाटील यांची पूर्णवेळ नेमणूक करावी अशी मागणी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी केली.पक्षप्रतोद नामदेव मेंडके यांनी मुरगूडसाठी दोन व्हेंटिलेटर प्रशासनाने द्यावेत अशी मागणी केली.
यावेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे, प्रांताधिकारी रामहरी भोसले यांनी पूर परिस्थिती व कोरोना बाबतची सद्यस्थितीची माहिती दिलीनगराध्यक्ष राजस्थान जमादार पक्षप्रतोद नामदेवराव मेंडके,जयसिंग भोसले, रणजीत सूर्यवंशी यांची भाषणे झाली.
ऐतिहासिक रस्ता
माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादांनी निपाणी – फोंडा या रस्त्याचे काम सुरु केले होते. त्यांचे हे ऐतिहासिक रस्त्याचे काम गेली पाच वर्षे सुरुच आहे. त्यामुळे गेली दहा वर्षे हा रस्ता दुरुस्तच झाला नाही. त्यात सध्या हे काम ठेकेदाराने बंद केले आहे. त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर झाला पाहिजे.
Previous Articleकोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांसाठी इतके बेड आरक्षित
Next Article लॉकडाऊनमध्ये ‘या’ राज्यपालांनी लिहिली 13 पुस्तके








