बेंगळूर/प्रतिनिधी
कोरोना रुग्णावर रुग्णालयात उपचार सुरु असताना निष्काळजीपणा केल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्या प्रकरणी डॉक्टर आणि इतर पाच कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, बेंगळूर पोलिसांनी रूग्णाच्या मृत्यूच्या आरोपाखाली शहरातील ड्युटी डॉक्टर आणि शहरातील एका खासगी रुग्णालयातील पाच इतर कर्मचार्यांविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे.
जीवनभीमा नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ एप्रिलला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर एका दिवसानंतर त्या रुग्णाला रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्यानंतर नोडल ऑफिसर आणि बीडब्ल्यूएसएसबीचे कार्यकारी अभियंता रवींद्र कुमार यांनी तक्रार दिली होती.
‘कुमार यांच्या तक्रारीनुसार, योग्य उपचार न देता रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर दोन दिवसांनी त्या रुग्णाचा मृत्यू झाला. अशी माहिती जीवनभिम नगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी आली आहे.