मिशिगन येथील शेतकऱयाची कल्पकता गाजतेय समाजमाध्यमांवर, कोरोना युद्धात आत्मविश्वास टिकविणे आवश्यक
अमेरिकेतील मिशिगन प्रांतातील एका शेतकऱयाने आपल्या 13 एकर मक्मयाच्या शेतात विशिष्ट प्रकारे बीजपेरणी करून ‘कोविड गो अवे’ असा कल्पक संदेश दिला आहे. सध्या या शेताचे छायाचित्र समाजमाध्यमांवर भलतेच लोकप्रिय झाले आहे. या प्रांतातील सॅगिनो काऊंटी या भागात हे शेत आहे.
जमिनीवरून पाहिल्यास हे शेत अन्य कोणत्याही मक्मयाच्या शेताप्रमाणेच दिसते. मात्र, ड्रोनमधून किंवा हेलिकॉप्टरमधून आकाशातून त्याचे छायाचित्र घेतल्यास ‘स्टोम्पआऊट, कोविड गो अवे’ असा इंग्रजी संदेश दिसतो. या शेतकऱयाने कोरोनाची लागण प्रारंभीच्या टप्प्यात असताना ही मक्मयाची लागवड केली. आता कोरोना ऐन भरात असताना त्याला या शेतातून गो अवे असा इशारा मिळाला आहे. समाजमाध्यमांवर या शेतकऱयाच्या कल्पकतेचे कौतुक होत आहे.
कल्पकतेने बीजपेरणी
सदर शेतकऱयाने बीजपेरणी करतानाच हा संदेश दिसेल, अशी व्यवस्था केली होती. या शेतातून फेरफटका मारताना हा संदेश पहावयास मिळत नाही. तथापि, शेतांमधील वाटा या संदेशाच्या आकाराच्याच करण्यात आल्या आहेत. त्या केवळ आकाशातून पाहिल्यास दिसून येतात. जॉन्सन नामक या शेतकऱयाची स्वत:ची वेबसाईट असून त्याने शेताचे छायाचित्र या वेबसाईटवर पोस्ट केले आहे. 12 सप्टेंबरला हे शेत इतरांना पाहण्यासाठीही खुले होणार आहे. तोपर्यंत कोरोनाचे संकट टळलेले असेल, अशी या शेतकऱयाची अपेक्षा आहे.
इंटरनेटवर अनेक लाईक्स

या शेताच्या छायाचित्राला इंटरनेटवरील फेसबुक आदी समाजमाध्यमांवर असंख्य लाईक्स मिळालेले आहेत. अशा कल्पकतेतून कोरोनाविरुद्ध लढण्याचा संदेश मिळतो, अशी प्रतिक्रिया अनेक दर्शकांनी व्यक्त केली आहे. कोरोनावर अद्याप निश्चित स्वरुपाचा उपाय लस अगर औषधाच्या माध्यमातून सापडलेला नाही. मात्र, समाजाच्या सर्व स्तरांमध्ये कोरोनाबद्दल जागृती वाढत आहे. या वाढत्या जागृतीचेच प्रत्यंतर या शेतकऱयाच्या कल्पकतेतून दिसून येते, असेही बोलले जात आहे.
समाजमाध्यमांचा लक्षणीय पुढाकार
कोरोनापासून दूर राहण्यासाठी सध्या तरी स्वत:ची परिपूर्ण काळजी घेणे हा एकच उपाय जगभरातील नागरिकांसाठी आहे. कोरोनामुळे अब्जावधी लोकांच्या जीवनशैलीत अनेक परिवर्तने घडली असून त्यातील कित्येक आचरणात आणावयास जटील अशी आहेत. तरीही एकमेकांचा आत्मविश्वास वाढविणे आणि स्वत:बरोबरच इतरांच्याही प्रकृतीची काळजी घेणे हे उपाय करणे आवश्यक आहे. समाजमाध्यमांवर अनेकांनी कल्पक संदेश प्रसारित करून याकामाला मोठा हातभार लावल्याचे दिसून येते. अनेकांनी समाजमाध्यमांवर त्यांनी शोधून काढलेल्या अगर उपयोगात आणलेल्या उपायांची माहिती दिल्याचे आढळते.
मलेशियाला आर्थिक दणका

क्वालालंपूर : कोरोना उदेकामुळे मलेशियाची अर्थव्यवस्था 17 टक्क्मयांनी घसरली आहे. गेल्या तिमाहीच्या आकडेवारीनुसार स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात लक्षणीय घट झाली आहे. लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग बंद राहिल्याने तसेच या देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लावणारा पर्यटन उद्योग थंडावल्याने देशाच्या परकीय चलनसाठय़ातही घट झाली असल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे निर्यात, औद्योगिक उत्पादन आणि ग्राहकांच्या व्ययशक्ती यातही मोठय़ा प्रमाणात घट झाल्याने अर्थव्यवस्थेला फटका बसल्याचे मलेशियाच्या मध्यवर्ती बँकेकडून घोषित करण्यात आले आहे.
14 दिवसांचे विलगीकरण

लंडन : ब्रिटिश सरकारने फ्रान्सहून येणाऱया लोकांसाठी 14 दिवसांचे विलगीकरण अनिवार्य केले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये फ्रान्समध्येही रुग्णसंख्या वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हा आदेश काढण्यात आला. ब्रिटनने फ्रान्सबरोबरच नेदरलँड्स, माल्टा आणि तीन इतर देशांनाही विलगीकरणाच्या कक्षेत आणण्याचा निर्णय घेतला आहे.
वीस मिनिटात चाचणी

लंडन : युरोपमधील संशोधकांनी कोरोनाची चाचणी वीस मिनिटात होईल असे नवे उपकरण शोधून काढले आहे. सार्स सीओव्ही-2 या विषाणूंवर विविध प्रयोग करून हे उपकरण तयार करण्यात आले. कोरोनाचा विषाणू अशाच प्रकारचा असल्याने त्यावरही या उपकरणाचा प्रयोग यशस्वी झाला. या चाचणीला एन1-स्टॉप-लॅम्प असे सांकेतिक नाव देण्यात आले आहे. ती शंभर टक्के अचूक असल्याचा संशोधकांचा दावा आहे. हे उपकरण उपयोगात आणण्यास सोपे, तुलनेने बरेच स्वस्त आणि तात्काळ परिणाम दर्शविणारे असल्याने चांगले लोकप्रिय होईल अशी शक्यता व्यक्त होत आहे.
मेक्सिको साहाय्य करणार

मेक्सिको सिटी : मेक्सिको देशात पाच लाखांहून अधिक कोरोना रुग्ण असून 55 हजारहून अधिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या देशाने कोरोना लस तयार करण्यासाठी अर्थसाहाय्य देऊ केले आहे. स्वत:च्या देशातील अगर अन्य देशांमध्ये संशोधकांना हे अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे. मेक्सिको सरकारने यापूर्वीच अर्जेंटिनाच्या प्रशासनाशी करार केला आहे.
राजकीय नेत्याचा बळी

कॅराकस : व्हेनेझुएलाची राजधानी कॅराकस जिल्हय़ाचे गव्हर्नर दारियो व्हिवास यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले आहे. गुरुवारी वयाच्या 70 व्या वषी त्यांचा मृत्यू झाला. ते सत्ताधारी सोशॅलिस्ट पार्टीचे ज्ये÷ सदस्य होते. उच्चपदावर असणाऱया राजकीय नेत्याचा मृत्यू होण्याची ही या देशातील पहिलीच वेळ आहे. ते कॅराकसमध्ये सामाजिक कामामुळे लोकप्रिय होते. कोरोना विरुद्धच्या युद्धात त्यांनी अनेकांना साहाय्य केले होते. त्यांचे कार्य सदैव लोकांच्या स्मरणात राहील, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
सर्वात तरुण बळी

व्हिएन्ना : शुक्रवारी ऑस्ट्रिया देशात त्या देशातील आतापर्यंतचा सर्वात तरुण कोरोना बळी गेला आहे. 22 वर्षांचा एक तरुण कोरोनाबाधेला बळी पडला. त्याला ऑस्ट्रियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ऑस्ट्रिया देश आतापर्यंत कोरोनापासून बराच सुरक्षित राहिला आहे. त्या देशात 375 बळी पडले आहेत. त्यातील बहुतेक सर्व 70 वर्षांच्या पलीकडच्या वयाचे आहेत. त्यामुळे विशीतल्या तरुणाचा मृत्यू झाल्याने देशात काहीसे चिंतेचे वातावरण आहे. दुसरी लाट येऊ नये यासाठी शक्मय तितकी उपाययोजना करण्यात येत आहे.









