बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यासह राजधानी बेंगळूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. दरम्यान, बेंगळूर शहरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची कमी होणारी संख्या लक्षात घेऊन बीबीएमपीने काही कोविड केअर सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला होता. कोविड केअर सेंटर (सीसीसी) बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दोन आठवड्यांपेक्षा कमी वेळानंतर बीबीएमपीने यू-टर्न घेतला आहे. बृह बेंगळूर महानगर पालिकेने (बीबीएमपी) बुधवारी म्हटले आहे की नवीन कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरीही यापैकी काही युनिट तसेच शारिरीक ट्रायएज सेंटर बंद न करता कायम ठेवले जातील.
दरम्यान, पत्रकारांशी बोलताना बीबीएमपीचे मुख्य आयुक्त गौरव गुप्ता म्हणाले की ही केंद्रे कार्यरत राहतील परंतु काही बेड्स काढून टाकण्यात येतील. बेंगळूरमध्ये प्रकरणे कमी झाल्यामुळे आम्ही सीसीसीमध्ये बेडची संख्या कमी करू. पण आम्ही केंद्रे बंद करणार नाही,” असे गुप्ता म्हणाले.
कोविड केअर सेंटरचे प्रभारी बीबीएमपी सहआयुक्त सरफराज खान म्हणाले की, मनुष्यबळ आवश्यक असलेल्या रुग्णालयांकडे वळवले जाईल. रोजच्या रोजंदारीच्या आधारावर आम्ही त्यांची नेमणूक करू आणि या केंद्रांवर कार्यवाही लवकर सुरू करू.” गेल्या काही महिन्यांत, बीबीएमपीने जवळजवळ २,०८८ बेडसह ४९ कोविड केअर केंद्रे सुरु केली आहेत. शिवाय शारीरिक ट्रायएज सेंटर ज्यांना घरी स्वत: ला अलग ठेवता येत नाही किंवा मध्यम स्वरुपाच्या वैद्यकीय मदतीची गरज नाही अशा रुग्णांना मदत करण्यासाठी. परंतु त्यांची संख्या ३० टक्के पेक्षा जास्त नव्हती.