प्रतिनिधी / बेळगाव
शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. लॉकडाऊन करूनही बाधितांच्या संख्येत घट झाली नाही. शहरातील रुग्णालयांमध्ये बेड मिळणे कठीण बनले आहे. अशा स्थितीत कोरोना बाधितांवर उपचार कुठे घ्यायचे, असा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे. त्यामुळे महापालिकेसह काही सेवाभावी संघटनांनी कोविड केअर सेंटर सुरू केली आहेत. महापालिका आणि आरोग्य खात्याच्या माध्यमातून चार ठिकाणी कोविड केअर सेंटर्स कार्यरत असून सात ठिकाणी संघटनांकडून कोरोना बाधितांसाठी विलगीकरणाची सोय करण्यात आली आहे.
महापालिकेने देवराज अर्स हॉस्टेल, कुमारस्वामी लेआउट हॉस्टेल, क्रीडा खात्याचे हॉस्टेल, बीसीएम हॉस्टेल आदी ठिकाणी सुविधा उपलब्ध करून अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास सरकारी आणि खासगी संस्थांच्या कोविड केअर सेंटरचा आधार घ्यावा. कोरोना बाधितांना या ठिकाणी औषधोपचार आणि राहण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सध्या शासनाने घरी विलगीकरण करण्यास बंदी घातली आहे. बाधितांची संख्या वाढत असून तसेच एका घरामध्ये 4 ते 5 रुग्ण असल्याने बाधितांवर विलगीकरण करता येत नाही. त्यामुळे एका घरात एकाच रुग्णाला विलगीकरण करावे, जास्त रुग्ण असल्यास कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्याची सूचना शासनाने केली आहे. त्यामुळे नागरिकांनी वर दिलेल्या कोविड सेंटरमध्ये कोरोना बाधितांना दाखल करावे, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
| हॉस्टेल | अधिकाऱयाचे नाव | संपर्क क्रमांक |
| देवराज अर्स हॉस्टेल, सुभाषनगर | गोपाल व्ही. सुख्ते | 7975282560, 9620372050 |
| कुमारस्वामी लेआउट होस्टेल | शंकर एस. गोकावी | 9449983377, 9620842050 |
| क्रीडा संकुल होस्टेल, नेहरूनगर | डॉ. संजय डुमगोळ | 8197888587 |
| बीसीएम होस्टेल, संगमेश्वरनगर | डॉ. संजय डुमगोळ | 8197888587 |
खासगी व संघ-संस्थांचे कोविड केअर सेंटर्स
| हॉस्टेल | संपर्क क्रमांक |
| मदनी फाउंडेशन | 9379230764 |
| इंडियन ऑईल सर्वो | 9448289955 |
| हिंडाल्को इंडस्ट्रीज | 9844365576 |
| एम इ एस मराठा मंदिर कल्याण मंडप | 7349670146 |
| राम केशव लॉज, अनगोळ नाका | 7829639034 |
| संत मीरा स्कूल, अनगोळ | 9845689241 |
| के एल ई लिंगराज कॉलेज कंपाऊंड | 9620850326 |









