इंटरनेटवर एका कोविड बाधिताचे छायाचित्र व्हायरल होत आहे. ओडिशातील एका कोविड रुग्णालयातील हे छायाचित्र आहे. आयएएस अधिकारी विजय कुलंगे यांनी 28 एप्रिल रोजी हे छायाचित्र ट्विटरवर प्रसारित केले आहे. रुग्णालयाची पाहणी करत असताना एका युवकाला बेडवर सीए (चार्टर्ड अकौंट्स) परीक्षेची तयारी करताना पाहिल्याचे त्यांनी नमूद केले आहे. छायाचित्रात कोरोनारुग्ण असलेला संबंधित युवक मास्कसह अभ्यास करताना दिसून येतो. संकटकाळात हे छायाचित्र लोकांना प्रोत्साहित करणारे आहे.
यश योगायोगाने मिळत नाही. यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागते. स्वतःचा ध्यास वेदनांचा विसर घडवून आणतात, ज्यानंतर यश केवळ औपचारिकता असे उद्गार आयएएस अधिकारी विजय यांनी काढले आहेत.
ओडिशामध्ये गंजम जिल्हय़ाचे जिल्हाधिकारी विजय मिश्रा हे शासकीय रुग्णालयात दाखल कोरोनाबाधितांची विचारपूस करण्यासाठी पोहोचले तेव्हा त्यांना एक युवक बेडवर सीएच्या परीक्षेची तयारी करत असताना दिसून आला. आम्हा सर्वांना हीच सकारात्मक कायम ठेवायची आहे असे आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी म्हटले आहे.









