अलझायमर हा ज्येष्ठ नागरिकांत आढळून येणारा सर्वसामान्य न्यूरोलॉजिकल डिसीज आहे. कोविड संसर्गाने अल्झायमर रुग्णांच्या समस्येत आणखीच भर घातली आहे. अशावेळी त्यांची काळजी घेण्याबरोबरच खबरदारी देखील घ्यायला हवी. कोविड संसर्ग हा अशा प्रकारच्या रुग्णांसाठी अधिक जोखमीचा राहू शकतो.
- ब्राझीलच्या एका अभ्यासानुसार अल्जाइमरग्रस्त रुग्णांचा कोविड संसर्गामुळे मृत्यू होण्याची जोखीम तीनपट अधिक राहू शकते.
- अल्जाइमरचा थेट संबंध हा स्मरणशक्ती, विचार करण्याची क्षमता आणि वर्तनाशी येतो. सुरवातीच्या काळात त्याची किरकोळ लक्षणे दिसू लागतात.परंतु हा आजार जेव्हा मेंदूपर्यंत पोचतो, तेव्हा त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात. लक्षणे अधिक गंभीर होतात. अर्थात अल्झायमर पीडित प्रत्येक रूग्णांतील आजार बळावण्याची गती कमी जास्त राहू शकते.
- या पार्श्वभूमीवर क्षणाचाही विलंब न लावता अल्झायमर रुग्णाचे निदान करणे गरजेचे आहे.
- आज देशातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत चालली आहे. यामुळे अल्झायमरची जोखीम वाढली आहे. कोविड संसर्ग हा न्यूरोलॉजिक सिस्टमवर व्यापक रुपाने परिणाम करतो. भविष्यात अल्झायमरपीडित रुग्णांना निमोनियासारख्या अतिरिक्त संसर्गाची जोखीम देखील राहू शकते. अशावेळी कोविडचा संसर्ग हा धोकादायक ठरू शकतो. म्हणून उपचारात सातत्य असायला हवे.
- अल्झायमरपीडित रुग्णांना कोविडची बाधा होऊ नये, यासाठी काळजी घ्यावी.
- अलिकडेच ब्रिटनमध्ये एका अभ्यासात 40 हजार जणांची चाचणी करण्यात आली. कोविडबाधित व्यक्तींच्या मेंदूचे ठराविक काळाने स्कॅनिंग करण्यात आले. यानुसार मेंदूतील बदल आणि हानी निदर्शनास आले. या रुग्णांत डिमेंशियाचीदेखील लक्षणे होती. परिणामी कोविडमुळे त्यांच्या विस्मरणात लक्षणीय वाढ झाली. अल्झायमर आणि कोविड या दोन्ही आजाराचा सामना करणार्या मंडळींना आयसोलेशन उपचारामुळे अडचण निर्माण झाली. उपचारात अडथळे आल्याने अल्झायमरच्या समस्येत भर पडत गेली. एका अभ्यासात म्हटले की, कोविड संसर्गामुळे विसरण्याची समस्या आणि काम करताना येणार्या अडचणी यासारख्या प्रश्नांनी गंभीर रूप धारण केले. कोविड संसर्ग हा अल्झायमर लक्षणांना आणखी गंभीर पातळीवर नेऊ शकतो.
डॉ. महेश बरामदे