वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोनाच्या प्रभावामुळे जगभरातील विविध उद्योगधंदे व व्यवसाय ठप्प पडले आहेत. यामुळे एकूणच आर्थिक क्षेत्र मोठय़ा प्रमाणात प्रभावीत झाल्याचे समोर येत आहे. याचा प्रभाव शेअर बाजारावरही होत असल्याने शेअर बाजारात अस्थिर वातावरण पहावयास मिळत होते. याच काळात बँकांचा एनपीएही वाढण्याचे संकेत व्यक्त केले जात असून कोरोनाचा प्रभाव बँकिंग क्षेत्रातही बसत असून चालू आर्थिक वर्षात सरकारी बँकांचे खासगीकरण करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील चार बँकांना रिझर्व्ह बँकेच्या तत्काळ सुधाणात्मक कारवाईचा आधार घेत त्यांच्यावर कर्ज वितरण, प्रबंधनाची पूर्तता आदींवर बंदी घालण्यात येणार आहे. सदर बँकांमध्ये इंडियन ओव्हरसीज बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युको बँक आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया यांना विकणार नसल्याचेही सांगितले आहे.
कोविड 19 च्या महामारीने फक्त सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची सुधारणा प्रक्रिया थांबविण्यात आली असून हा निर्णय खासगी क्षेत्रातील बँका आणि वित्तीय व्यवस्थेवरही पडणार असल्याचे संकेत आहेत.









