वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
शीतपेय निर्मितीच्या क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनी कोका-कोला इंडियाकडून कोविड 19 च्या लढय़ासाठी सरकारला 100 कोटी रुपयांपेक्षा अधिकची आर्थिक मदत करणार आहे. कंपनी सदरची रक्कम ही आरोग्य रक्षक आणि सर्वसामान्यांच्या मदतीसाठी देणार असल्याचे सांगण्यात येते. कोरोनाच्या लढाईसाठी कंपनीचा हा वाटा आहे. कंपनी देशभरातील 10 लाखापेक्षा अधिक लोकांपर्यंत या निधीमधून मदत देणार असल्याचे कोका-कोलाने स्पष्ट केले आहे.
कंपनी आरोग्य कर्मचाऱयांना पीपीई किट अन्य वैयक्तिक साधनांचा पुरवठा करणार आहे. यासाठी कंपनी आपल्या एनजीओ आणि बॉटलिंग पार्टनर्स यांनाही सोबत घेणार असल्याचे नमूद केले आहे. या सर्वांच्या मदतीने बेरोजगार आणि प्रवासी कामगारांना खाण्यापिण्यासह अन्य मदत येत्या काळात जास्तीत जास्त प्रमाणात देण्यावर कंपनी भर देणार आहे.








