क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
केंद्रीय क्रीडा मंत्रालयातर्फे देशातील सर्व क्रीडा संघटनांना विविध स्पर्धांच्या आयोजनाबाबत मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यायच सक्त सूचना पत्रकाद्वारे दिल्या आहेत. कोरोना महामारीच्या काळात सुमारे नऊ महिन्यांत कोणत्याही क्रीडा स्पर्धा भरविल्या गेल्या नाहीत. त्यामुळे होतकरू क्रीडापटूंना याचा फटका बसला आहे. हळूहळू क्रीडा खात्यातर्फे स्पर्धांच्या आयोजनाला परवानगी दिली जात आहे. त्यांचे नियोजन करताना सॅनिटायजर्सचा वापर, सामाजिक अंतर राखले, मास्क वापरणे व प्रेक्षकांशिवाय जैवसुरक्षित वातावरणात स्पर्धा भरविण्याची परवानगी स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियातर्फे देण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास संयोजकांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. तरी संयोजकांनी क्रीडा स्पर्धा भरविताना कोविडसंबंधी मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशा सक्त सूचना या पत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत.









