सावंतवाडी:
जिल्हयात कोरोना प्रादुर्भाव काळात प्रत्येक तालुका निहाय कोविड सेंटरम्ध्ये जोखमीची अशी सेवा करणाऱया डॉक्टर, नर्स, अन्य कर्मचाऱयाची सेवा खंडित न होण्याच्या दृष्टिने प्रयत्न केले जाणार आहे. त्यांच्या या जोखीमग्रस्त सेवेची दखल शासन घेणार आहे, असे पालकमंत्री तथा राज्याचे उच्च व तत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सावंतवाडीत स्पष्ट केले.
कोरोना प्रादुर्भावाचे प्रमाण जिल्हय़ात कमी होत चालले आहे. त्यामुळे तालुकानिहाय असलेली कोविड सेंटरे बंद करण्यात आली आहेत. तर काही सेंटरमध्ये रूग्ण संख्या कमी आहे. येत्या काळात चालू असलेली सेंटर बंद होण्याचा संभव आहे. त्यामुळे डॉक्टर व नर्स व अन्य कर्मचाऱयावर नोकरीची गदा येणार आहे. कोरोनाकाळात कोणीही सेवा देण्यास पुढे येत नसताना कोविड सेंटरमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून कोविड योध्दा म्हणून सेवा दिली आहे, चांगल्या पगारी नोकरी सोडून कोविड सेंटरवर सेवा बजवण्यास पुढे आलेत. हे कर्मचारी तीन महिन्यांच्या कालवधीसाठी शासनाने दिलेल्या हाकेमुळे पुढे आले, पण ही सेंटर्स बंद होत असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे त्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत पालकमंत्री सामंत यांनी स्पष्ट केले की कोविडकाळात ज्यानी प्रंटवर काम केले त्यांची दखल शासन घेणार आहे. त्यांच्या भवितव्याबाबत निश्चित विचार केला जाईल, असे स्पष्ट केले.
सिंधुदुर्ग जिल्हयात कोविड सेंटरमध्ये काम करणारे शंभरहून अधिकजण डॉक्टर, नर्स, डाटा इंट्री ऑपरेटर आहेत त्यांच्या भवितव्याबाबत पालकमंत्री सामंत यांनी लक्ष वेधले आहेत.









