वार्ताहर / कोवाड
कोवाड (ता. चंदगड ) येथील पार्वती मारूती कांबळे (वय 55 ) या नदीत पडून मयत झालेल्या महीलेचा मृतदेह शनिवारी मिळाला. रेस्कू ऑपरेशन च्या पथकाला हा मृतदेह दुंडगे गावच्या हद्दीत नदी काठावर मिळाला.
पार्वती कांबळे या शुक्रवार दि.25 रोजी कोवाड येथील जून्या कोल्हापूर पध्दतीच्या बंदाऱ्यावरून नदीपलीकडे असलेल्या एका क्लिनीककडे जात होत्या. आजारी असल्या कारणाने दवाखान्याला जात असताना ताम्रपर्णी नदीवरील बंदाऱ्यावरच त्यांना चक्कर आली आणी दुर्दैवाने त्या वाहत्या नदीत कोसळल्या होत्या. 30 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांचा शनिवारी दिडच्या सुमारास मृतदेह मिळाला. त्यांच्या अपघाती निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









