वार्ताहर / कोवाड
कोवाड (ता. चंदगड ) येथील बाझारपेठ सोमवार दि.31 ऑगष्ट ते रविवार दि.6 सप्टेंबर पर्यंत तब्बल एक आठवडाभर कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय खुद्द बाझारपेठ संघटनेने च घेतला आहे.
सध्या कोवाड आणी परिसरात कोरोना रूग्न वाढत आहेत. काही डॉक्टर , आणि मोठ्या व्यापारी मंडळींना ही कोरोनाची लागण झाल्याने सध्या कोवाडमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या महीनाभरात सोशल डिस्टन्स चे तीन तेरा वाजले होते. गेल्या चार पाच दिवसांत व्यापारी बंधूनी स्वतः हून सुरक्षेच्या दृष्टीने दुकांनासमोर सुरक्षागेट, काऊंटरला फायबर काचा बसविल्या आहेत. मात्र ग्राहकांकडून ही बेफिकीरता वाढली होती.
रवीवारी सायंकाळी व्यापारी संघटनेची बैठक झाली यामध्ये बहुतांश मंडळींची मते लक्षात घेता सध्याच्या धोकादायक परिस्थितीवर मात करण्यासाठी आपले सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. कोरोना रोग दुर होता त्यावेळी आपण बाझारपेठे बंद पाळलेली होती आणि आता हा विळखा आपल्या जवळ येवुन आपले व्यापारी बांधव कोरोनाग्रस्थ बाधीत होत आहेत त्यांचा अनुभव खुपच भयानक आहे. प्रचंड मानसिक त्रास आणि न पेलावणारा आर्थिक खर्च विचारात घेतला तर सर्वांनी आपली आपल्या कुटुंबाची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. असा बैठकीत सूर निघाला . त्यामूळे तात्काळ बैठकीत आठवडाभर बाझारपेठ बंद करण्याचा निर्णय घेतला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









