वार्ताहर / कोवाड
कोवाड ता. चंदगड येथे एक हॉटेल कामगार सुदैवाने बूडता बूडता वाचला. ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत पाटील यांच्या धाडसी साहसाने त्यांना वाचविण्यात यश आले.
पूर ओसरल्या नंतर हॉटेल गारवा या दुकानाची स्वच्छता करत असताना हॉटेल कामगाराचा तोल गेला. काही क्षणातच तो पाण्याच्या प्रवाहात वाहू लागला. हा परीसर नदीकाठाला लागून आहे. त्यामूळे तो पडता क्षणीच नदीच्या दिशेने वाहू लागला. दरम्यान दोन बिल्डींगच्यामध्ये कार पार्कीगच्या सेडच्या खांबाला त्याने घट्ट पकडले. मात्र तेथे पाणी जास्त व पाण्याला प्रवाह जास्त होता. त्यामूळे त्यांना वाचविणे कठीण होते. ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत पाटील यांनी क्षणाचा ही विलंब न करता पाण्यात उडी टाकून त्यांच्या सोबतीला गेले. दरम्यान उपस्थित नागरिकांनी महादेव कडेमणी यांच्या घरातून दोर टाकली . श्रीकांत पाटील यांनी तो दोर बुडणाऱ्या कामगाराच्या हाती तात्काळदोर दिल्यामूळे त्यांना वाचविण्यात यश आले.
आपला जीव धोक्यात घालून एका गरिब कामगाराचा जीव वाचविल्याचा आनंद श्रीकांत पाटील यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
Previous Articleराजस्थानात कोरोना रुग्णांची संख्या 50 हजार पार
Next Article कोडोलीचे रेव्हरंड सुमित्र विभूते यांचे निधन








