नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोळसा मंत्रालयाचे माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप राय यांना †िदल्लीतील विशेष सीबीआय न्यायालयाने तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. वीस वर्षांपूर्वीच्या झारखंडमधील कोळसा घोटाळय़ाप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. 14 ऑक्टोबर रोजी न्यायालयाने रे यांना दोषी ठरवले होते. त्यानंतर पुढील सुनावणी न्यायालयाने 26 तारखेपर्यंत पुढे ढकलली होती. सोमवारी झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. कोळसा घोटाळा प्रकरणामध्ये कोणत्याही वरि÷ पदावरील व्यक्तीला आणि मंत्र्याला शिक्षा होण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे.
राय यांनी मंत्री असताना 1999 साली झारखंडमधील गिरिदीहमधील ब्रम्हादिहामधील कोळसा खाणींची 105.153 हेक्टर जमीन कास्ट्रोन टेक्नोलॉजी लिमिटेड कंपनीला दिली होती. याप्रकरणी राय यांच्याबरोबरच कोळसा मंत्रालयातील दोन माजी वरि÷ अधिकाऱयांबरोबरच कास्ट्रोन टेक्नोलॉजी कंपनीच्या अधिकाऱयांनाही दोषी ठरवण्यात आले होते. कोळसा मंत्रालयाचे तत्कालीन अतिरिक्त सचिव प्रदिप कुमार बॅनर्जी, निर्देशक महेंद्र कुमार अग्रवाल हेही संशयाच्या भोवऱयात अडकले होते. कलम 120-बी आणि 120- बी/अंतर्गत संबंधितांना दोषी ठरवण्यात आले आहे. याचबरोबरच कलम 409 सरकारी अधिकाऱयाने फसवणूक करणे आणि कलम 420 फसवणूक कलमांतर्गतही राय यांना दोषी ठरवले आहे. राय हे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या कार्यकाळात कोळसा मंत्रालयाचे राज्यमंत्री (संयुक्त कार्यभार) होते.









