ऑनलाईन टीम / रांची :
झारखंडमधील धनबादमध्ये कोळसा खाणीत 20 फूट उंचीवरून मलबा पडल्याने 13 कामगारांचा दबून मृत्यू झाला आहे. तर दहा ते 12 कामगार गाडले गेल्याची भीती व्यक्त होत आहे. घटनास्थळी बचावकार्याला वेग आला आहे. निरसा ब्लॉकच्या ईसीएल मुग्मा भागात ही घटना घडली.
धनबादमधील कोळसा खाणीत दररोज मोठय़ा संख्येने महिला, पुरुष आणि लहान मुलांसह अनेकजण आउटसोर्सिंगवर अवैध उत्खनन करण्यासाठी येतात. आजही हे कामगार कामावर होते. ईसीएल व्यवस्थापनाकडून टेंच कटिंग करण्यात आले. त्यावेळी अचानक 20 फूट उंचीवरुन मलबा कोसळला. या मलब्याखाली दबून 13 कामगारांचा मृत्यू झाला. तर 10 ते 12 कामगार ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती व्यक्त होत आहे. घटनास्थळी बचावकार्याला वेग आला आहे. काहींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर काही जखमींवर तेथील खासगी नर्सिंग होममध्ये उपचार सुरू आहेत. धनबाद निरसा पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहेत.









