मुंबई
गेल्या तीन महिन्यात कोळसा उत्पादनात घट झाली असल्याचे कोल इंडियाने स्पष्ट केले आहे. एप्रिल ते जून या कालावधीत 121 दशलक्ष टन इतक्या कोळशाचे उत्पादन करण्यात आले. या तुलनेत मागच्या वषी याच कालावधीत 136 दशलक्ष टन इतका कोळसा उत्पादन करण्यात आला होता. गेल्या जून महिन्यामध्ये 39 दशलक्ष टन इतका कोळसा उत्पादित केला गेला. मागच्या वषी याच महिन्यात 44 दशलक्ष टन उत्पादन घेण्यात आले होते. म्हणजेच जूनमध्ये उत्पादन 12 टक्क्यांनी घटले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्पादनात घट झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे कोळशाची मागणी वाढली नसल्याचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान असं असलं तरी कोल इंडियाने मात्र 2023-24 सालासाठी एक अब्ज टन कोळसा उत्पादनाचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे.









