नवी दिल्ली : देशातील दिग्गज सार्वजनिक क्षेत्रातील कोल इंडिया कंपनीच्या नोव्हेंबरमधील उत्पादनाची आकडेवारी सादर करण्यात आली आहे. यामध्ये कोल इंडियाचे उत्पादन 3.4 टक्क्यांनी वधारुन 5.17 कोटी टनावर राहिले आहे. कंपनीने मंगळवारी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीमधून ही आकडेवारी सांगितली आहे. यामध्ये मागील आर्थिक वर्षात 2019-20 च्या नोव्हेंबर महिन्यात कंपनीचे उत्पादन पाच कोटी टनाच्या घरात राहिल्याची नोंद केली आहे. चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते नोव्हेंबरमधील कालावधीत हा आकडा वधारुन 33.45 कोटींवर राहिला आहे. जो एक वर्षातील समान कालावधीत 33.04 कोटी टन राहिल्याची माहिती आहे. देशातील एकूण कोळसा उत्पादनात कोल इंडियाची हिस्सेदारी 80 टक्क्यांनी अधिकची राहिलेली आहे.
कोल इंडियाकडून कोळसा उठाव चालू नोव्हेंबर महिन्यात वाढून 5.13 केटी टनापर्यंत पोहोचला आहे.
जो 2019-20 मधील नोव्हेंबरला 4.75 कोटी टन राहिला होता. देशातील एकूण कोळसा उत्पादनात कोल इंडियाची हिस्सेदारी 80 टक्क्यांनी अधिकची राहिलेली आहे.









