वृत्तसंस्था /नवी दिल्ली :
मायनिंग क्षेत्रातील कंपनी कोल इंडियाचा निव्वळ नफा पहिल्या तिमाहीत 55 टक्के इतक घटला आहे. 30 जूनअखेर संपलेल्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा नफा 2 हजार 079 कोटी रुपये इतका होता. मागच्या वषी कंपनीचा निव्वळ नफा याच कालावधीत 4 हजार 629 कोटी रुपये इतका होता. कंपनीच्या महसूल उत्पन्नातही साधारणपणे 25 टक्क्यांची घट झाली असल्याचे समजते. कंपनीला यंदा वषी 18 हजार 486 कोटी रुपयांचा महसूल मिळाला असून मागच्या वषी तो याच कालावधीत 24 हजार 938 कोटी रुपये इतका होता. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा मोठय़ा प्रमाणात परिणाम या व्यवसायावर झाल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. आगामी काही काळही असाच परिणाम जाणवेल, अशी शक्मयता वर्तवली जात आहे. उर्जा क्षेत्र आणि उद्योगांकडून होणारी मागणी मोठय़ा प्रमाणात घटली असल्याने याचा परिणाम नफ्यावर व महसुलावर होत असल्याचे कंपनीने सांगितले.









