वृत्तसंस्था/ कोलकाता
कोल इंडिया लिमिटेड यांच्याकडून केवळ कोळसा आयातकरण्यासाठी ई लिलाव योजनेची एक नवीन श्रेणी सुरु करण्यात आली आहे. याचा उद्देश देशातील कोळसा पुरवठय़ाला चालना देणे आणि यांच्या मदतीनेच जवळपास 15 कोटी टन काळशाची होणारी आयात कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
आयातीत स्थिर वातावरण आणण्यासाठी ही विशेष ई लिलाव योजना 2020 च्या अंतर्गत कोळसा खरेदी देशासाठी उपयोगाची ठरणार असल्याचे म्हटले आहे. कोल इंडियाच्या एका अधिकाऱयांनी यावेळी म्हटले आहे, की हा पर्याय देशातील कोळसा आयातीला मजबूत बनविण्यासोबतच तो सरकारच्या आत्मनिर्भर भारत योजनेला चालना देणारा ठरणार आहे.
देशातील कोळशावर आधारीत उद्योग
वीज प्रकल्प आणि लोखंड निर्मिती, सिमेंट, रसायन, पोलाद आणि अन्य उद्योगामध्ये उत्पादन निर्मितीच्या कामासाठी कोळशाचा वापर प्रामुख्याने केला जात असल्याची माहिती आहे. यामुळे यावर आधारीत संभाव्य ग्राहकांकडून कोळशाची मागणी केली जाते.









