वारणानगर / प्रतिनिधी:
कुशिरे (ता.पन्हाळा) येथे जोतिबा देवाला दानधर्म करायचे असे सांगून एका वृद्धेसह दोघांना फसवून बावीस हजाराचे सोन्याचे दागिने घेउन मोटारसायकल वरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी पोबारा केला.
या दोन अज्ञात चोरट्यान विरोधात कोडोली पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला असून या बाबतची फिर्याद श्रीमती विमल मच्छिंद्र गडकरी वय ६० रा. कुशिरे यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे.
या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, विमल व तिचा मुलगा यांचे कुशिरे (ता. पन्हाळा) गावी जोतिबाकडे जाणारे रोडलगत असलेली चहा टपरी चालवतात. बुधवार ता.२१ दुपारी १२.४५ वाजता २५ ते ३० वयोगटातील दोन चोरटे मोटरसायकलवरून चहा टपरीमध्ये आले त्यांनी त्यांच्याकडे काळा चहा मागितला. चहा पिऊन झाल्यानंतर त्यातील एका चोरट्याने वृद्धेला म्हणाले आम्हाला जोतिबा देवाचे दर्शनाकरिता जायचे होते परंतु सोडत नाहीत व आम्हांला देवाला दानधर्म करावयाचा आहे असे म्हणून खिशातून ५०० रुपयाच्या दोन नोटा असे एकूण १००० रुपये टेबलवर ठेवले. वृद्धेला त्यावर काहीतरी जिन्नस ठेवा असे सांगितले. त्या वृद्ध महिलेने तीन वर्षापूर्वी विकत घेतलेली बावीस हजार किमतीची गळ्यातील सोन्याची सव्वा तोळे वजनाची दोन पदरी शंकुमणी असलेली बोरमाळ ठेवले असता ते दोन अज्ञात चोरटे पैसे व बोरमाळ घेऊन मोटारसायकल वरून पसार झाले. पुढील तपास फौजदारी नरेंद्र पाटील पाटील करत आहेत.
Previous Articleप्रगतशील लेखक संघ, एल्गार परिषदेतर्फे कार्यक्रम
Next Article ‘लाळय़ा खुरकत’लसीकरण मोहीम संथगतीने









