हुपरी शहरात कोरोनाने दोन चांदी उद्योजकासह पाच जणांचा मृत्यू
हुपरी व परिसरात अनेकांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने नागरिकांना दिलासा
वार्ताहर / हुपरी
हुपरी व परिसरातील सहा गावांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसांनदिवस अखंडितपणे वाढत आहे. आता पर्यंत रुग्ण संख्या180 झाली आहे. दरम्यान, चंदेरी नगरीत चांदी उद्योजक 50 वर्षीय चौघांचा व 60 वर्षावरील एकाचा असे पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.त्यामुळे भितीचे सावट गडद प्रमाणात पसरले आहे. परंतू अनेकांचे रिपोर्ट निगेटिव्ह येत असल्याने नागरिकांना दिलासाही मिळाला आहे.
हुपरीसह परिसरात रविवार अखेर पर्यंत सात पर्यंत कोरोना विषाणू संसर्गाची साखळी वाढतच राहिली होती मात्र आज अनेकांचे निगेटिव्ह अहवाल आल्याने दिलासा मिळाला आहे.तळदंगे गावात परप्रांतीय व्यक्ती वास्तव्यास होता परंतु गावात न येता परस्पर दवाखान्यात दाखल झाला होता त्याचा उपचारांती मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णसंख्या मात्र स्थिर आहे.
हुपरी व परिसरातील गाववार कोरोना रुग्णांची रविवार पर्यतची संख्या अशी– हुपरी (134),पट्टणकोडोली (06), रेंदाळ (21), इंगळी(2), यळगुड (9), रांगोळी (8) तळंदगे हे सध्या सुरक्षित आहे. याप्रमाणे हुपरी परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 180 वर पोहोचली आहे.








