प्रतिनिधी / हुपरी
हुपरी येथे चांदी उद्योजक डॉक्टर्स बँक संचालक, व्यापारी व छोटे मोठे व्यावसायिक यांच्यासह 317 जणांवर कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना रुग्णांची सख्या अखंडितपणे वाढत असल्याने नागरिकांच्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माहितीनुसार 178 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले असल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र कोरोनाने एकूण एकोणीस जणांचा बळी घेतला आहे. अनेक करोना पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे हुपरी शहरात व परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे .शहरातील समूह संसर्गाचा धोका टाळण्यासाठी नगरपरिषदे मार्फत औषध फवारणी, गोळ्या वाटप, भाग निर्जंतुकीकरण करण्याचे काम चालू आहे. रोज सकाळी घंटा गाडीद्वारे सर्व नागरिकांना कोरोना संदर्भात काळजी घेण्याचे आवाहन केले जाते.
हुपरीत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे मिटर सुसाट सुटले आहे. कोल्हापूर ,इचलकरंजी जयसिंगपूर व इतर ठिकाणी उपचार सुरू असताना अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरात भीतीते वातावरण निर्माण झाले असून, हुपरीतील कोरोना रुग्णांचा आकडा 317 वर पोहचला आहे.
हुपरी हे शहर कर्नाटक सीमेलगत असल्याने त्या भागातील व परिसरातील सहा ते सात गावाचे केंद्र असून मुख्य बाजारपेठ आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांची व नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे. याकडे शासनाने व प्रशासनाने लक्ष घालून प्रतिबंधात्मक उपाय करावेत अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
Previous Articleअभिनेता संजय दत्तला रुग्णालयातून डिस्चार्ज
Next Article पुणे विभागातील 95 हजार 48 रुग्ण कोरोनामुक्त!








