प्रतिनिधी / हुपरी
हुपरीमध्ये कोरोनाने आज पाचवा बळी गेला. प्रत्येक सामाजिक कार्यात सहभाग घेणारे व गोर गरीबांना मदतीचा हात देणारे हुपरीतील 48 वर्षीय चांदी उद्योजक असलेल्या व्यक्तीचा कोरोनो अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले होते. पण, आज सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला हि वार्ता कळताच शहरात दुःखाचे सावट पसरले.
सदरच्या व्यक्तीला त्रास होऊ लागल्याने कुटूंबियांना त्रास होऊ नये याकरिता स्वतः स्वॅब तपासणी केली असता त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याच्या कुटुंबाला क्वॉरंटाईन करण्यात आले होते. आज सकाळी या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात होते.
याबरोबरच हुपरी शहरातील कोरोनामुळे मृत्यू पावल्याची ही पाचवी घटना असून याआधी 50वर्षावरील तिघांचा व60वर्षावरील एकाचा असे 4 मृत्यू झाले आहेत. शहरात नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. कडक बंदोबस्त करून उपाययोजना करणे गरजेचे असल्याची चर्चा सध्या गावामध्ये होत आहे.