हुपरी/वार्ताहर
हुपरी नगरीतील एका चांदी उद्योजकाने पिस्तुलमधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. अमोल माळी (वय-५५ ) असे या चांदी उद्योजकाचे नाव आहे. माळी यांनी आजाराला कंटाळून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. ते सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असायचे. त्याच्या आत्महत्येनंतर हुपरी परिसरात एकच खळबजनक उडाली. आज, मंगळवार सकाळी ही घटना उघडकीस आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
चांदी व्यापारी उद्योजक अमोल माळी हे गेल्या काही दिवसापासून आजारी होते . त्यांच्यावर उपचारही सुरू होते. त्यांना नुकताच डिस्चार्जही मिळाला होता. घरी आल्यावर आजाराच्या वेदनेने घायाळ झालेल्या अमोल यांनी राहत्या घरी आजाराला कंटाळून त्यांनी स्वतःवर पिस्तूलातून गोळी झाडून आत्महत्या केली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के व पोलीस फौजफाटा दाखल झाले असून या घटनेचा तपास सुरु आहे.
Previous Articleकोल्हापूर : शिरोळमध्ये मटण विक्रेता निघाला कोरोना पॉझिटिव्ह
Next Article लसीकरणानंतर…









