प्रतिनिधी/हातकणंगले
हातकणंगले, आळते, माणगाव वाडी, अतीग्रे या परिसरातील डोंगर रागांमध्ये बिबट्याचा वावर असल्याची चर्चा नागरिकातून सुरू असतानाच काही रेल्वेचे कर्मचारी व रेल्वेचे अधिकारी यांनी रात्रीच्या वेळेस एक बिबट्या त्याच्या पिलासह असल्याचे दिसून आले. त्यानुसार तात्काळ वनविभागाचे कर्मचारी सतर्क होऊन रेस्क्यू टीम सहम या डोंगर परिसरामध्ये रात्रभर बिबट्याचा शोध घेण्याची मोहीम सुरू केली. तसेच नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत बिबट्या असल्याची खात्री नसली तरी शेतकऱ्यांनी एकटेच शेतामध्ये अथवा शेत घरांमध्ये जाऊ नये आपणच आपली खबरदारी घेत सर्व कार्य करावे असे वन विभागातील कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. पण बिबट्या आल्याची बातमी मात्र सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









