पुलाची शिरोली/वार्ताहर
हातकणंगले पंचायत समितीच्या सभापती निवडीसाठी २२ जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. या विशेष निवडणुकीचा आदेश जिल्हाधिकारी डॉ दौलत देसाई यांनी पंचायत समितीला दिला आहे.
हातकणंगलेचे तत्कालीन सभापती महेश पाटील यांनी २३ डिसेंबर रोजी पदाचा राजीनामा दिला होता. यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी २२ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावयाचा आहे. तसेच अवघ्या १५ मिनिटांत माघार घेवून या पदासाठी दुपारी २ वाजता निवडणूक होणार आहे.
पंचायत समितीचे सभापतीपद हे खुल्या प्रवर्गासाठी आहे. त्यामुळे या पदावर वर्णी लागण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सदस्य डॉ. सोनाली पाटील व उत्तम सावंत यांच्या नावाची चर्चा आहे. तसेच आमदार विनय कोरे यांच्या गटातून ही डॉ. प्रदीप पाटील हे इच्छूक असल्याचे बोलले जात आहे. बावीस सदस्यांपैकी विनय कोरे गटाचे ५, भारतीय जनता पार्टीचे ६, आमदार प्रकाश आवाडे गटाचे ६, शिवसेनेचे २, शेतकरी संघटना २ व राष्ट्रीय काँग्रेस १ असे सध्याचे बलाबल आहे. सभापती निवडीसाठी भारतीय जनता पार्टी, जनसुराज्य शक्ती व कोल्हापूर जिल्हा ताराराणी आघाडी आवाडे गट अशी होण्याची शक्यता आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









