प्रतिनिधी / हातकणंगले
आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार हातकणंगले नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्यासह अन्य तिघा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यावर नगराध्यक्ष यांनी तात्काळ तीन दिवस नगरपंचायतीचे कामकाज बंद केले आहे.
हातकणंगलेमध्ये आज अखेर 149 नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. यातील102 नागरिक बरे होऊन घरी परतले असून तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 44 नागरिकांच्यावर उपचार सूरू आहेत. नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्षांनी केले आहे.









