प्रतिनिधी / जयसिंगपूर
जयसिंगपूर नगरपरिषदेच्यावतीने भारतीय स्वातंत्र्य दिन शनिवारी उत्साहाने साजरा करण्यात आला,
या समारंभाचे वैशिष्ट्य म्हणजे जयसिंगपूर नगरपरिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी जयसिंगपूर नगरपरिषदेच्या प्रांगणात, गांधी चौक व शहराच्या दसरा चौकातील राजर्षी शाहू स्टेडियमवर झालेल्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्यामध्ये झेंडावंदन करीत असताना आपल्यासोबत कोरोना महामारीच्या काळामध्ये सर्वात आघाडीवर राहून जीवाची परवा न करता सेवा बजावलेल्या नगरपरिषदेच्या बांधकाम व स्वच्छता विभागाकडील कर्मचाऱ्यांना आपल्या सोबत घेऊन या सर्व कर्मचाऱ्यांना आपल्या बरोबरीने सन्मान देऊन त्यांच्या सोबतीने झेंडावंदन केले.
नगरपरिषद इमारतीसमोर झालेल्या झेंडावंदन समारंभामध्ये ध्वजारोहण करीत असताना नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी कोरोना काळात अतिशय जबाबदारीने आणि जोखमीचे काम केलेल्या बांधकाम विभागाकडील माणिक माने यांना सोबत घेऊन ध्वजारोहण केले,
गांधी चौक येथील झेंडावंदन प्रसंगी ध्वजारोहण करत असताना नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यांनी स्वच्छता विभागाकडील हंगामी कर्मचारी प्रभाकर माने यांना ध्वजारोहण करीत असताना आपल्या बरोबरीने सन्मान दिला, दसरा चौकातील राजर्षी शाहू स्टेडियम वरील मुख्य ध्वजारोहण प्रसंगी कोरोनाच्या काळात अतिशय जोखमीने आणि जबाबदारीने सेवा बजावलेल्या रविंद्र कांबळे या स्वच्छता विभागाकडील कर्मचाऱ्यांसोबत ध्वजारोहण केले आणि या स्वच्छता कर्मचाऱ्याला आपल्या सोबत ठेवून त्याचा सन्मान केला,
प्रत्येक ठिकाणी झेंडावंदन करीत असताना झेंड्याची दोरी आपल्यासोबत ओढण्याचा मान नगराध्यक्ष यड्रावकर यांनी या सर्व कर्मचाऱ्यांना दिला. प्रभारी नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांना दिलेल्या या सन्मानामुळे नगरपालिका प्रशासनाला मधील अधिकारी व कर्मचारी यांच्यासह जयसिंगपूर शहरांमधील नागरिकांच्या मधून त्यांच्या या निर्णयाचे कौतुक केले जात आहे.
जयसिंगपूर शहराच्या नगराध्यक्षा अलगीकरण कक्षात असल्यामुळे नगराध्यक्षपदाची धुरा व पदभार उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आलेला आहे, याचाच भाग म्हणून आज स्वातंत्र्य दिन सोहळा प्रभारी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या हस्ते संपन्न झाला, आजच्या समारंभाचे वैशिष्ट म्हणजे नगरपालिका प्रशासनाच्या वतीने कोरोना महामारी च्या काळात जयसिंगपूर शहरांमधील ज्ञात-अज्ञात, डॉक्टर्स, महसूल, आरोग्य, पोलीस दल, स्वच्छता विभाग, स्वयंसेवी संस्था,व्यक्ती या सर्वांनी दिलेल्या योगदानाबद्दल या सर्व घटकांचा कोरोना योद्धा म्हणून प्रशस्तीपत्र देऊन नगरपरिषदेच्या वतीने सन्मान व सत्कार करण्यात आला.
नगर परिषदेकडील स्वच्छता विभागाचे कर्मचारी, सफाई कामगार, झाडू कामगार या सर्वांना प्रभारी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी कोरणा योद्धा म्हणून केवळ सन्मान चिन्ह नाही तर प्रत्येक कर्मचाऱ्याला भेटवस्तू देऊन या सर्व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.शासनाचे निर्देश पाळत अतिशय साध्या पद्धतीने भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 74 वा वर्धापन सोहळा संपन्न झाला, यावेळी नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर शिक्षक व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









