‘सीपीआर’ला रोज लागतोय 9 मेट्रीक टन ऑक्सिजन
प्रतिनिधी / कोल्हापूर
सीपीआर हॉस्पिटल कोरोना आयसोलेटेड हॉस्पिटल आहे. सद्यस्थितीत हॉस्पिटलमध्ये 450 ऑक्सिजनेटेड बेड आहेत. 380 रूग्ण ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत. त्यांच्यासाठी रोज सरासरी 9 मेट्रीक टन ऑक्सिजनची गरज भासते, अन् दीड दिवसांत सीपीआरला इतका ऑक्सिजन पुरवठा नियमितपणे करण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे.
सीपीआर हॉस्पिटलमध्ये गतवर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत ऑगस्टमध्ये 20 मेट्रीक टनाचा ऑक्सिजन टँक उभारला आहे. टँकमधील 30 टक्के अर्थात 6 मेट्रीक टन ऑक्सिजन हा इमर्जन्सीसाठी राखीव ठेवला जातो. टँकरमधून टँकमध्ये 15 मेट्रीक टन ऑक्सिजन भरला जातो. सरासरी दोन दिवसांतून 1 ऑक्सिजन टँकर सीपीआरमध्ये येत आहे. त्यामुळे 400 हून अधिक रूग्णांना नियमितपणे ऑक्सिजन मिळणे शक्य झाले आहे. सोमवारी सायंकाळी सीपीआरमध्ये ऑक्सिजन टँकर आल्याने सीपीआर प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला.