मंगळवारी रूग्ण वॉर्डात, संशयित रूग्ण केएमटी'द्वारे
सीपीआर’मध्ये
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. प्रतिदिन सरासरी 300 वर रूग्ण येऊ लागल्याने सीपीआर हॉस्पिटलमध्ये रूग्णांची त्यांच्या नातेवाईकांची गर्दी वाढत आहे. मंगळवारी शहरातील संशयित रूग्ण तपासणीसाठी केएमटीतून सीपीआरमध्ये आणले जात होते, जिल्ह्याच्या अन्य भागातील रूग्णही सीपीआरमध्ये येत आहेत. त्यांचे कुटुंबीयही सीपीआरमध्ये येत आहे. त्यातून मंगळवारी सायंकाळी सीपीआर इमारतीतील व्हरांडÎातही नातेवाईकांची गर्दी दिसून आली.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत कोरोना रूग्णसंख्या वाढली आहे. संशयितांच्या तपासण्याही वाढल्या आहेत. विकएंड लॉकडाऊननंतर पुन्हा कोरोना रूग्ण वाढत आहेत. सोमवारी जिल्ह्यात कोरोनाने 11 जणांचा मृत्Îू झाला. मंगळवारी 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी तीनशे नवे रूग्ण दिसून आले आहेत. सीपीआर हॉस्पिटलमध्ये कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. पण दोन दिवसांत रूग्ण वाढल्याने सीपीआरमधील नॉन कोरोना रूग्णांना अन्यत्र हलवले जात आहे. मंगळवारीही ही प्रक्रिया सुरूच राहिली.
सीपीआरमध्ये दुपारनंतर येणाऱया कोरोना रूग्णांची संख्या वाढली, शहरातील संशयित, रूग्णही केएमटीतून सीपीआरमध्ये आणले जात होते. याशिवाय जिल्ह्Îाच्या अन्य भागातून रूग्ण त्यांच्या कुटुंबियांसह सीपीआरमध्ये आले. त्यामुळे सायंकाळी सीपीआरमधील वॉर्ड रूग्णांनी हाऊसफुल्ल तर व्हरांडे नातेवाईकांनी त्यांच्या साहित्यांनी भरून गेल्याचे पहायला मिळाले. बुधवारीही नॉन कोरोना रूग्ण स्थलांतर सुरूच राहणार आहे. त्यामुळे गुरूवारी संपुर्ण सीपीआर हॉस्पिटलमध्ये फक्त कोरोना रूग्णांवर उपचार केले जाणार असल्याचे निश्चित झाले आहे.